🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल ( १५ मार्च ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे.
यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब हे यांनी देखील देखील वर्षावर दाखल होत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.
सरकारमधील बड्या मंत्र्यांचे बैठकांचे सत्र आज (१६ मार्च ) देखील सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
