Share

“…तर त्याला शरद पवार, वळसे पाटील जबाबदार”, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील असा आरोप करत आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्ते यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान ‘मला कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. काहीही न सांगता पोलीस मला थेट येथे घेऊन आले आहेत. हे बेकायदेशीर आहे. माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून माझी हत्या झाल्यास त्याला गृहमंत्री जबादार असतील’, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“आता अशी माणसं दुर्मीळच झाली आहेत”, संजय राऊतांची प्रतापभाई आशर यांना श्रद्धांजली

IPL 2022: सर्वात रोमांचक सामन्यात बनले अनेक विक्रम; धवनने रचला इतिहास तर गिलने गाठला ‘हा’ टप्पा

“…यानंतरही कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं घडल?”, सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा सवाल

IPL 2022: ‘दिवस खराब होता, मात्र …’ सामना थोडक्यात गमावल्यानंतर कर्णधार मयंकचे भावनिक वक्तव्य

“..त्यावेळी भुजबळांच्या घरावरही शिवसैनिकांनी हल्ला केला होता”, भातखळकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!