Share

Ajit Pawar | “कुणाच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदींचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”, अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणाच्या आधी अजित पवार यांचं भाषण होणार होतं. मात्र त्याआधीच ते व्यासपीठावरून निघून गेले. यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र माध्यमांशी संवाद साधत असताना ते नाराज नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी भाजप पक्षाच्या उमेद्वारांवर देखील निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी भाजप उमेदवारांना फटकारलंः

व्यासपीठावरून निघून गेल्या बाबत अजित पवार यांना विचारण्यात आल्यावर आम्ही वॉशरूमलाही जायचं नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून येतात, कुणाच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवाव, अशा शब्दात भाजपवाल्यांना अजित पवार यांनी फटकारलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोलः

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल औरंगाबाद येथील पैठण मध्ये सभा होती. या सभेमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नाराजगीच्या विषयावर भाष्य केलं. एवढंच नाही तर त्यांनी जयंत पाटील यांना देखील धारेवर धरलं. कसं काय पाटील बर हाय का,  दिल्लीमध्ये काय एकलं ते खरं आहे का, अशा डायलॉग बाजी मध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली. एवढंच नाही तर जयंत पाटील यांनी अजित पवारांना बोलावलं नव्हतं, कारण जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते व्हायचं होतं, मात्र ते झाले नाहीत आणि त्यामुळेच त्यांनी अजित दादांना यांना बोलावलं नसून अजित पवार रागात निघून गेले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!