🕒 1 min read
मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पाश्वभूमिवर सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सरवणकरांची पिस्तूल जप्त केली आहे.
सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढः
तक्रारीनंतर पिस्तुल चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर कलमं लावण्यात आली आहे. या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता वाचला होता, असंही सुनील शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती.
महेश सावंत यांची प्रतिक्रीयाः
याप्रकरणी, 2 महिन्यांपासून आम्ही पोलिसांना सांगत होतो त्यांना आवरा. त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. पोलीस जखमी झाला असता. त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवावी लागली, आम्ही शिवसेनेशी निष्ठावंत असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली असल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला आहे. या प्रकरणावरुन 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचा जामीन झाल्यानंतर मातोश्रीवर त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्याः
- Karuna Munde | राज्यात आणखीन एका दसरा मेळाव्यावरुन पेटणार वाद? करुणा मुंडे घेणार भगवान गडावर मेळावा
- FCI Recruitment 2022 | युवकांना भारतीय खाद्य महामंडळासोबत काम करण्याची मोठी संधी..
- Ajit Pawar | राष्ट्रवादीतही भूकंप होणार? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शरद पवार तणावात!
- SBI Recruitment २०२२ | भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागा
- Ashish Shelar | महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी केलं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
