🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावात सोमवारी सकाळी 6 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. यावर प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरवातीला या घटनेचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.कर्नाटक सरकार व केंद्र सरकारनं याकडे गांभीर्यानं पहावं. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी,अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी,असं आवाहन आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. कर्नाटक सरकारने आणि केंद्र सरकारने घटनेकडे गांभीर्याने पहावे, दोषींना शोधून काढून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2021
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2021
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2021
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराजांचा अवमान तर सोडाच, अनादरही खपवून घेतला जाणार नाही’
- कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘हे हारमखोर, बेईमानी मंत्री राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांसोबत मला आणि शिवसेनेला संपवण्याचा घाट घालत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
