कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला. या लाटेत कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक रुग्ण नोंदवले गेले असून हजारो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आता राज्यात स्थिती आटोक्यात येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या बाजूला कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात दररोज सुमारे १५०० हुन अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. तर, कोरोनामुक्तांचा आकडा देखील नव्या कोरोना बाधितांपेक्षा कमी आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १६ टक्के इतका असून तो राज्यातील सर्वाधिक रेट आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाला कोरोनाला अटकाव घालण्यात अपयश आले असून आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.
१ मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ३७१ ऍक्टिव्ह रूग्ण होते. आता जिल्ह्यात १२ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. तरी देखील अनेक ठिकाणी नागरिक कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूरसह सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत परिस्थिती चिंताजनक आहे. यामुळे वेळीच स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि योग्य खबरदारी घेण्यासाठी अजित पवार व टोपे हे सोमवारी कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजप फ्रॉड पार्टी आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते मागत आहेत जनतेची माफी !
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- ‘त्या’ उड्डाणपुलाला ख्वाजा गरीब नवाज नाव देण्याची शिवसेनेची मागणी; तर भाजपचा विरोध
- राज ठाकरेंच्या वाढदिवशी मुंबईकरांना मनसे देणार मोफत कोविशिल्डचे डोस
- मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढा; राऊतांच संभाजीराजेंना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
