Share

मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढा; राऊतांच संभाजीराजेंना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती.

यासोबतच दिल्लीत मराठा समाजाची गोलमेज परिषद घेऊ, अशी घोषणा देखील संभाजीराजे यांनी केली होती. आता मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंना केलं आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विनंती केली आहे. संभाजीराजेंनी मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढावा,’ असं राऊत म्हणाले. ते सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनांवर देखील भाष्य केलं.

‘संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. मराठा आरक्षण ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊ हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी निर्णय घ्यायचा आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा चेंडू आता त्यांनी पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!