🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपचा दारूण पराभव केला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील ढवळून निघाले आहे. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये संघर्ष टोकाला पोहचला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले तृणमूलचे अनेक नेते स्वगृही परतत आहेत.
तर, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत.
बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. मात्र, या सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे. असा आरोप भाजपाने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कसोटीचे महाभारत! सातव्या सामन्यात इशांतच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेश एका डावाने पराभुत
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही; संजय राऊतांचा पुन्हा चंद्रकांतदादांना टोला
- धक्कादायक! युरो २०२० स्पर्धेदरम्यान अचानक कोसळला ‘ख्रिस्टीयन एरिक्सन’
- PNB ग्राहकांना ‘या’ नंबर द्वारे मिळू शकते अकाउंट बॅलन्सची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
