Share

Ajit Pawar on Karnataka CM | “तक्रार काय करता? आरे ला का रे उत्तर द्या” ; अजित पवारांचा मंत्र्यांना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar on Karnataka CM | मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सातत्याने महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा देत आहेत. त्यांनी जत तालुक्यातील गावांवर देखील ताबा सांगितला आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “तक्रार काय करता त्यांचे आरे ला कारे ने उत्तर द्या. त्यांना महाराष्ट्राची भूमिका दाखवा. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले पाहीजे. महाराष्ट्रात असलेला सत्ताधारी पक्षच कर्नाटकमध्ये राज करत आहे. भाजपचे मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये आहेत आणि इथ भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यांनी योग्य रस्ता काढावा.”

“कर्नाटकचे मुख्यमंत्री वेगवेगळे स्टेटमेंट देतात. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट करायला पाहीजे. केंद्राला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर वकील हरीश साळवे यांच्याकडे जबाबदारी द्यावी,” असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद अधिकच गडद होत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचा कर्नाटकातील बेळगावी दौरा पुढे ढकलावा लागला. हे मंत्री तेथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार होते. त्यांच्या दौऱ्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि देसाई आज बेळगावी जाणार होते.

महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, आमच्या दोन मंत्र्यांच्या बेळगावी भेटीबाबत आम्ही कर्नाटक सरकारला अधिकृतपणे कळवले आहे. देसाई म्हणाले की, आम्ही यात्रा पुढे ढकलली आहे, रद्द केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!