भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये सुरू असलेल्या वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ॲक्शन मोडमध्ये आला आहे. अशात उद्या बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघातील प्लेइंग इलेव्हनमधील काही फ्लॉप खेळाडूंना संघातून बाहेर काढू शकतो.
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हन मधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा शिखर धवन (Shikhar Dhawan) ला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. शिखर धवनच्या जागी इशान किशन (Ishan Kishan) ला संघामध्ये संधी दिली जाऊ शकते. कारण इशान किशन हा एक डावखुरा फलंदाज असून तो सलामीसाठी रोहित शर्माला चांगली साथ देऊ शकतो. इशान किशन हा शिखर धवनपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतो. तर या सामन्यादरम्यान शिखर धवनला आपली बॅट शांत ठेवून, बेंचवर बसावे लागू शकते.
शिखर धवनसोबत रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधील भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शहाबाज अहमद (Shahabaz Ahamad) ला देखील बाहेर काढू शकतो. शहाबाजच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेल (Akshar Patel) ला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण या मालिकेच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यामध्ये शहाबाजने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने देखील संघाला निराश केले आहे. या सामन्यामध्ये तो शून्यावर बाद झाला असून, या सामन्यामध्ये तो एकही गडी बाद करू शकला नाही.
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), दीपक चहर, शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रजत पाटीदार, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश आहे.
तर बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, दीपक चहर ही नावे प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Akkalkot | “…अन्यथा कर्नाटकात जाणार” ; अक्कलकोटमधील 11 गावांचा ठराव! ग्रामस्थांचा सरकारला इशारा
- Malaika Arora | “हे माझ्यासाठी कधीच सोप नव्हतं…” ; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायकाचे स्पष्टीकरण
- Sushma Andhare | “पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात, मग पत्रकार काय….”; सुषमा अंधारेंचा परखड सवाल
- Sanjay Raut | बाबासाहेबांच्या संविधानाला आणि महाराष्ट्राला संपवण्याचे काम सुरू – संजय राऊत
- Sushma Andhare | “‘या’ तीन मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा”; सुषमा अंधारेंचा विरोधकांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

