मुंबई: अभिनेता अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात अजय देवगनबरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
यावर्षी जानेवारी महिन्यात आजयचा या चित्रपटातील लुक शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अजय देवगन या चित्रपटात विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आर्मी ऑफीसरच्या अजयच्या या लुकचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटाची कथा १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारीत आहे.
https://twitter.com/ajaydevgn/status/1412388378834718725
या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही देखील दिसणार आहे. नोरा करत असलेली भूमिका पहिले परिणीती चोप्रा साकारणार होती. मात्र त्यावेळी परिणीती दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला. नोराने एक डान्सर म्हणून स्वत:ला सिद्ध केलंच आहे. आता अभिनेत्री म्हणून सिद्ध कराण्याची संधी तिला मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कराड यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिले केंद्रीय मंत्री पद
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न


