नवी दिल्ली : नुकसानीत असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळेच आता एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर एअर इंडिया कंपनी मूळ मालकांच्या ताब्यात जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समुहाने संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया रेदी करण्यासाठी बोली लावली होती. त्यामुळे आता एअर इंडियाची ५३ वर्षानंतर लवकरच घरवापसी होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासूनभार सरकारच्या एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु होती. केंद्र सरकारने आज पत्रकार परिषद घेत एअर इंडियाची बोली टाटा सन्सने जिंकल्याची माहिती दिली. त्यामुळे एअर इंडियावर पुन्हा एकदा टाटा ग्रुपची मोहोर उमटली आहे. १९३२ मध्ये एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. पण स्वातंत्र्यानंतर १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. यानंतर एअर इंडिया असे त्याचे नामांतरण झाले.
Welcome back, Air India ???????? pic.twitter.com/euIREDIzkV
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021
आजमितीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसे मोदी सरकारने २०१८ मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.
‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची टाटाकडे लवकरच घरवापसी होणार आहे. टाटा यांनी १८ हजार कोटींची बोली लावली. येत्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

