अमरावती – अमरावती जिल्हा बँक निवडणूक पार पडली असली तरी नेत्यांचे एकमेकांवर आरोप, शिवीगाळ सुरु आहेत. सहकार पॅनलने निवडणूक जिंकल्यावर विजयी जल्लोशात वीरेंद्र जगताप यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आई वरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे. विजय मिळाल्यानंतर जि.प अध्यक्ष बबलू देशमुख व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत राज्यमंत्री बच्चू कडू परिवर्तन पॅनलचे उमेदवार होते. त्यांना या निवडणूकीत विजय मिळाला आहे. परंतु बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप यांच्या सहकार पॅनलने ही निवडणूक काबीज केली. निवडणूकीच्या निकालानंतर स्थानीक शासकीय विश्रामगृह येथे जल्लोष करतांना बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीवरून पोलीसांनी बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर भादंविच्या कलम २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वीरेंद्र जगतापांचा पुतळा जाळला
बँकेच्या निवडणूकीचे तीव्र पडसाद उमटत असून बुधवारी प्रहारच्या कार्यकत्र्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा पुतळ जाळून संताप व्यत्त केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पुतळा जाळल्याने गाडगेनगर पोलीसांनी बंटी रामटेक, श्याम इंगळे, गोलू पाटील, योगेश कावरे, निलेश पानसे, विक्रम जाधव, यांच्यासह आठ ते दहा जणांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम आणखी एका हत्येप्रकरणी दोषी; पंचकुला न्यायालयाचा निर्णय


