नाशिक :- देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वधर्मीयांच्या मागणीचा विचार करून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देत कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, डॉ.शेफाली भुजबळ, कालिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, नगरसेवक समिना मेमन, सुफी जीन, गुरमीत बग्गा, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, दत्ता पाटील, महेश भामरे, शंकर मोकळ, परमीत बग्गा, संजय खैरनार, दिनेश कमोद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,देशात आणि राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ धार्मिक स्थळे होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वांचीच धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी होती. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व धार्मिक स्थळे आपण उघडली आहे. मात्र कोरोना अद्यापही कायम असून त्याचा पुन्हा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कुठेही अधिक गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी सप्तश्रृंगीगड येथे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिर येथे महाआरती केली. त्यानंतर शिंगाडा तलाव येथे गुरुद्वारा व जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा या धार्मिक स्थळाला भेट देत चादर चढविली.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं होणार लसीकरण; टोपेंनी केली ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेची घोषणा
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर


