🕒 1 min read
अबुधाबी : काल झालेल्या सामन्यात केकेआरने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत प्लेऑफ गाठण्याच्या अशा कायम ठेवल्या आहेत. विजयासाठी 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 16.1 षटकात अवघ्या 85 धावांवर आटोपला. राहुल तेवतिया (44) वगळता राजस्थानचा दुसरा कोणताही फलंदाज केकेआरच्या वेगवान गोलंदाजांच्या कहराचा सामना करू शकला नाही. केकेआरच्या या विजयसह मुंबईसाठी प्लेऑफचा प्रवास खडतर झाला आहे.
प्लेऑफ समीकरण
राजस्थानला 86 धावांनी पराभूत केल्यानंतर, केकेआरचे 14 गुण आणि त्यांच्या खात्यात सर्वोत्तम नेट रन रेट आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादला 170 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल. हे एक प्रकारचे अशक्य लक्ष्य आहे पण केकेआरला प्लेऑफमध्ये पोहचण्याची अधिकृतपणे मुंबई हैदराबाद सामन्याच्या निकालापूर्वी पुष्टी होऊ शकत नाही.
दरम्यान, मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत. मुंबई इंडियन्स संघ सामना सुरु होण्यापूर्वीही आयपीएलमधून बाहेर जाऊ शकतो. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात एकही चेंडू न खेळता त्यांचे आयपीएलमधले आव्हान संपुष्टात येऊ शकते.
असे झाले तर मुंबई प्लेऑफ मधून पडेल बाहेर :
नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि त्यांनी जर प्रथम फलंदाजी स्विकारली तर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जात येऊ शकते. पण जर मुंबई इंडियन्सची प्रथम गोलंदाजी आली तर त्यांचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे. कारण पहिली गोलंदाजी आल्यावर मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी कोणतेही समीकरण नाही, प्रथम फलंदाजी आल्यावर जर त्यांनी २००पेक्षा जास्त धावा केल्या तरच त्यांना प्ले-ऑफमध्ये जाता येऊ शकते. त्यामुळे आजच्या सामन्यातला नाणेफेकीचा कौल हा सर्वात महत्वाचा असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या मलिक यांनी ते पालकमंत्री असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडला’
- सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम आणखी एका हत्येप्रकरणी दोषी; पंचकुला न्यायालयाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

