🕒 1 min read
मुंबई: राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवडणूकीपूर्वी काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले मात्र हे चूकीचे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मविआचे चारही उमेदवार विजयी होणार असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान आज राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अजून मतदानाची परवानगी देण्यात आली नाही. घटनेने या दोघांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर हे अंधभक्त बिळातच लपतील”, संजय राऊतांचा टोला
- “…धमकीनंतर मोदी सरकारने खबरदारीची योजना म्हणून काय करावे?”, संजय राऊतांचा टोला
- भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ- संजय राऊत
- “उद्या मुंबई-महाराष्ट्रात ‘अल कायदा’ने काही विध्वंसक कृत्य केले तर…”, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “ज्या पक्षाने माझ्यासारख्या अतिसामान्य…”, अमोल मिटकरी यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
