Share

“चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे गिफ्ट सायंकाळपर्यंत…”, अमोल मिटकरींचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले असून मतदानास सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीच भाजप आणि मविआमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे.

“भाजप कडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत .शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडुन येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल.” असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे इम्तियाज जलील (Imtiaz Jali)यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआचे चारही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!