Share

“भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा…”, अमोल मिटकरींचा टोला

Published On: 

मुंबई: राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करत मनात अजिबात धाकधूक नसल्याचे म्हटले आहे. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. आता यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“भाजपाने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा सारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतुन “भांजे” म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रा वरील युद्ध श्रीकृष्ण जिंकुन देणार.”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी नरोवाकुंजरोवा हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की असल्याचे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार कारण देवेंद्र फडणवीस यांचा धाक असल्याचेही बोंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांनी नेमका कुणाला टोला लगावला याबाबत तर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!