Share

भिंगार पोलीस ठाण्यात अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसाला मारहाण

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: मारहाणीच्या एका प्रकरणात पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात आणलेल्या व्यक्तीने पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना भिंगार कँप पोलीस ठाण्यात दुपारी घडली. पोलिसांनी सदर व्यक्तीच्या विरूध्द मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला आहे.निलेश पेंडुलकर असे पोलिसाला मारहाण करणा-या व्यक्तीचे नाव आहे.

भिंगार परिसरातील खळवाडी येथे निलेश पेंडुलकर व 4-5 जणांनी घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखविल्या प्रकरणी शनिवारी भिंगार कँप पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पानसरे यांनी भिंगार मधील ब्राह्मणगल्ली येथे जाऊन निलेश पेंडुलकर याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी पेंडुलकर याने पानसरे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.त्यावर पानसरे यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता निलेश पेंडुलकर याने थेट पोलीस कर्मचारी पानसरे यांच्यावर हल्ला चढविला.त्याने पानसरे यांना तोडावर मारले तसेच त्यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.त्यानंतर पानसरे यांच्या तक्रारीनुसार पेंडुलकर याच्या विरोधात मारहाम करणे व सरकारी कामात अडथळा आणणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!