मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विशागणी झाली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात टीका करत असतात. सध्या शिवसैनिकांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात टीका करायला सुरूवात केली आहे.
काय आहे शिवसेना पक्षाची मागणी? –
त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता. त्यावळी शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असल्याचा आरोप, ठाकरे गटाकडून गेला जात आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात दादर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. त्याठिकाणी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवसैनिकांनी याठिकाणी केली आहे.
आमदार सदा सरवणकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार असून ही चौकशी दादर पोलीस करणार आहेत. पोलीस दादर परिसरातील सर्व सीसीटीव्हि तपासणार आहेत. तसचे पोलिसांकडून साक्षीदारांनाही पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती समोर आली.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | “सुप्रिया ताई तुम्ही काळजी करु नका, सरकार…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- Sharad Pawar | “दिल्ली समोर झुकणार नाही”; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
- Devendra Fadnavis | अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांनी पुन्हा केलं वक्तव्य म्हणाले…
- Omraje Nimbalkar । शिंदे गटाकडून ओमराजेंना ‘ही’ ऑफर; पण ओमराजे म्हणतात…
- Jayant Patil | राजकीय वादात सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर, जयंत पाटील म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

