🕒 1 min read
अमरावती : गुरूवार 8 सप्टेंबर रोजी अमरावतीमधील एक तरूणी बेपत्ता झाली होती. मुलगी सापडत नसल्याने तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती. बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे. पोलिसांनी पकडलेल्या मुलाला सर्व माहीत आहे. परंतू तो पोलिसांना माहिती देत नाही, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभीत झाला आहे, अशी तक्रार राजापेठ पोलिसांत दिली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी नवनीत राणा यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करण्यात आला आहे.
नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल-
तसेच, पोलीसांनी पकडलेला युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावतीमधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. याकरीता खासदार नवनीत राणा यांनीसुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. पोलीस त्याच्याकडून मुलीची माहिती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोपही नवणीत राणा यांनी पोलिसांवर केला होता.
नवणीत राणा यांनी पोलिसांवर केलेल्या आोपानंतर संपूर्ण पोलीस कर्मचारी आणि वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामध्येच पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना चांगलाच दम भरला होतो. त्याचबरोबर त्यांनी नवनीत राणांना सोडणार नसल्याचा इशाराही दिला होता.
एवढंच नाहीतर पोलिसांवर जर कोणी बेकायदेशीर दबाव आणणार असेल, तर आमच्या विरोधात राहु. नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही, असं म्हणत अॅड. असिम सरोदे यांनी नवणीन राणा यांना लक्ष्य केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण
- Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
- Sushma Andhare | तुम्हाला विसर्जनाची साधी पद्धत आणि संस्कार माहीत असू नयेत आणि आपण स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवून घेता?
- Atul Londhe | “गणपती विसर्जनामध्ये जखमींना 10 आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना…”, अतुल लोंढेंची शिंदे सरकारकडे मागणी
- Shivsena । दादर राड्यावेळी गोळीबार केलेला नाही, जाणीवपूर्वक बदनामीचा डाव; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
