Share

‘अहो राऊत, तुमच्या नवाब मलिकांचे कोर्टाने तोंड फोडलेय, त्यावर आधी बोला’

Published On: 

मुंबई : भाजपाचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, पण लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी – सीबीआयच्या घोषणा करतात. पण तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरुन आम्हाला विराध केला जातो. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपावर केली होती. त्यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अतुल भातखळकर ट्विटकरत म्हणाले, ‘अहो संजय राऊत, हायड्रोजन बॉम्ब फोडणारे तुमचे मुख्यमंत्रीप्रिय नवाब मलिक यांचे खोटे पुरावे दिल्याबद्दल कोर्टाने तोंड फोडले आहे त्यावर बोला आधी’, अशा शब्दात भातखळकरांनी संजय राऊतांवर निशाना साधला आहे.

यापूर्वी अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कट्टरवाद्यांच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत असल्याची टीका केली होती. त्यामुळेच दंगेखोरांना पोलिसांवर दगडफेक करण्याची हिम्मत केली. असा आरोप केला होता.

सध्या महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या मोर्चातून उसळलेला हिंसाचार, समीर वानखेडे प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यावर न्यायालयाने नोंदविलेले मत यावरुन प्रचंड राजकारण तापले आहे. सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडताना दिसत आहेत. आता यावर ठाकरे सरकार काय प्रतिउत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!