नांदेड: कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे व हे प्रक्रिया करुन उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव कसा मिळेल याचे संपूर्ण कसब देण्यापर्यंतची भूमिका ही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले.
जिल्ह्यातील विविध विकास योजनांची आढावा बैठक शुक्रवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांचे कृषी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळ बोलताना डवले म्हणाले, विकेल ते पिकेल याचा अर्थ केवळ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अथवा शेतीचे उत्पादन घेऊन बाजारात बसणे किंवा शेतकऱ्यांना बाजारात बसविण्यासाठी मदत करणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही.
कापसासारख्या पिकासाठी ”एक गाव एक वान” जर लागवडीखाली आले, कापसाच्या उत्पादनाला काढणी पश्चात तंत्रज्ञानाची जोड मिळाली, गोळा केलेला कापूस कचरा विरहित जर गोळा केला गेला तर अशा कापसाला अधिकचा भाव मिळू शकेल. धागा चांगला यावा यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. स्मार्ट कॉटनसाठी अग्रह धरला पाहिजे व शिवाय कापसावर बोंडअळी व्यतिरिक्त बोंडसरसाठी अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

