Share

औरंगाबादच्या हवामान बदलासाठी औरंगाबाद मनपा आणि स्मार्ट सिटीचा ‘डब्लूआरआय’सोबत करार

Published On: 

औरंगाबाद : शहराचे हवामान बदलण्यासाठी औरंगाबाद मनपा आणि स्मार्ट सिटीने आता पुढाकार घेतला आहे. महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया (डब्लूआरआय) या संस्थेला शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये हवामान बदलासाठी सर्वप्रथम प्रदूषण कमी केले जाणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, नद्यांची स्वच्छता करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करणे यासोबतच अनेक उपाय योजना केल्या जाणार आहेत.

हवामान बदलासंदर्भात बुधवारी (दि.२२) एक करार करण्यात आला. हा करार महाराष्ट्र शासन व चिल्ड्रेन इनवेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या सहकार्याने झाला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांनी बुधवारी डब्लुआरआयच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन माध्यमाने चर्चा केली. त्या वेळेस ‘डब्लूआरआय’च्या लुबैना रंगवला यांनी सांगितले अतिवृष्टी, वाढीव तापमान, वाळवंटीकरण, दुष्काळ, ढगफुटी हे सर्व हवामान बदलांमुळे होते. याला वेळेवर आळा घालण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डब्लूआरआय औरंगाबाद शहरासाठी हवामान कृती आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या हवामान कृती आराखड्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला की जे प्रदूषण झाले आहे त्याला कमी करणे आणि दुसरा शहर आणि नागरिकांना हवामान बदलासाठी तयार करणे. डब्लूआरआय औरंगाबादला केंद्र शासनाच्या क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क मध्ये सुधारित स्थान प्राप्त करण्यासाठी ही सहकार्य करेल. झालेल्या करारानुसार डब्लूआरआय औरंगाबाद शहराला २०२३ पर्यंत पाच टप्यात ३० वर्षाचा कृती आराखडा तयार करून देईल.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

आयुक्त पाण्डेय यांनी करारावर सह्या केल्यानंतर सांगितले, मनपा एक समर्पित हवामान बदल विभाग बनवणार आहे. या विभागात उपायुक्त स्तराचे अधिकारी नेतृत्व करतील. तर या विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. याचे कार्य माहिती संकलन पासून सुरू होणार असल्याचे पाण्डेय म्हणाले. आराखड्यामुळे शहराला केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत हवामान बदलावर काम करण्यासाठी निधी प्राप्त करण्यासाठी मदत होईल. चिल्ड्रेन इनव्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांचे या कार्यासाठी आर्थिक सहकार्य लाभले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!