Share

कालच्या विजयानंतर ‘मुंबई इंडियन्स’ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर

Published On: 

मुंबई : इंडियन्सने गेल्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी त्यांची कामगिरी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. या IPL मध्ये देखील मुंबई इंडियन्सची अशीच कामगिरी पाहायला मिळत आहे.

या आय.पी.एल दरम्यान मुंबई इंडियन्स ने सलग पाच सामने जिंकले आहेत. तर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले. कालच्या दोन सामन्यानंतर प्वाईंट्स टेबलमध्ये काही महत्वाचे बदल झाले. विजयासह समान 10-10 गुण असताना देखील नेट रनरेटच्या आधारे मुंबई नंबर एक वर पोहोचली आहे. मुंबई नंतर पॉईंट टॅबलेमध्ये दिल्ली दुसऱ्या नंबरवर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या स्थानी आहे.

मुंबई इंडियन्सच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,”ज्या प्रकारे आम्ही क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे आम्हाला पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास मिळत आहे. स्पर्धेच्या पहिल्या हाफमधील कामगिरी पाहून आनंद झाला आहे.” मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहून यंदाच्या देखील या आय. पी. एल मध्ये मुंबई इंडियन्सच विजेतेपद पटकवणार असे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!