Share

दिड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कॉलेज कट्टा पुन्हा बहरला

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून महाविद्यालयांची दारे बंद होती. अखेर आज ती उघडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी ५० टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश करताच पुष्पगुच्छ देऊन तर काही विद्यार्थ्यांना वेलकम म्हणत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. बुधवारी पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत काही महाविद्यालयात ३५ तर काही महाविद्यालयात ४० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आजपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालय उघडले. तत्पूर्वी महाविद्यालय स्वच्छ आणि सॅनेटाईझ करून घेण्यात आले होते. आज सकाळी महाविद्यालय उघडताच महाविद्यालयात कोरोनाचे दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. तसेच पहिली लस घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकही लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन वर्ग भविण्यात आले.

याशिवाय महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल गनद्वारे तपासणी करून त्यांचे कोरोनाबाबत समुपदेशन करण्यात आले. महाविद्यालय परिसरात यावेळी सुरक्षित वातावरणात राहा, मास्क लावा, सॅनेटाईझरचा वापर करा असे बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केल्याने शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना आजपर्यंत ऑनलाईनच शिक्षण घ्यावे लागले.

२२ व २३ मार्च २०२० पासून केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. तेव्हापासून विद्यापीठाचे आत्तापर्यंत दोन शैक्षणिक वर्ष संपले आहेत. या दोन्ही वर्षांत ऑनलाईन क्लासेस आणि परीक्षा घेतलेल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग कधी सुरू होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर २० ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!