Share

सरकारसोबतची नववी बैठक निष्फळ झाल्यानंतर आंदोलनातील शेतकरी नेत्यांना आल्या NIA-EDच्या नोटीसा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- तब्बल 50 हून अधिक दिवस दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारपुढे कधी नव्हे इतका मोठा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीही मोदी सरकारचे निर्णय आणि कायद्यांविरोधात असंतोष पाहायला मिळाला होता. मात्र, प्रत्येकवेळी मोदी सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने तोडगा काढण्यात यशस्वी ठरले होते.

परंतु आता कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले कृषी आंदोलन या सगळ्याला अपवाद ठरताना दिसत आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी भाजपने पोलिसी बळाचा वापर, वेळ काढूपणा किंवा अपप्रचार, अशाप्रकारची सर्व शस्त्रे वापरुन पाहिली. मात्र, भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला आंदोलक शेतकऱ्यांनी तितक्याच चोखपणे उत्तर दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा आणि पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह 40 जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केंद्र सरकारच्या एजन्सीच्या या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बादल यांनी शनिवारी ट्वीट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एनआयए आणि ईडी (अंमलबजावणी संचालनालय) यांनी शेतकरी नेते आणि शेतकरी चळवळीतील समर्थकांना प्रश्न विचारून धमकावण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला. ते देशद्रोही नाहीत. 9 वी चर्चा अयशस्वी झाली. त्यानंतर, हे स्पष्ट झाले आहे की भारत सरकार केवळ शेतकर्‍यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!