औरंगाबाद: कोरोना काळात औरंगाबाद सह मराठवाड्याची आरोग्याची मदारही घाटी हॉस्पिटल वर होती. घाटी हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर परिस्थिती दाखल केल्या जात होता. त्यामुळे इतर हॉस्पिटलच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू घाटीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी बीपी, शुगर, आदी आजार, आरोग्य सेवेसह,इतर अनेक कारणे आहेत. असे असले तरी मात्र सर्वात जास्त प्रमाणात उपचार देखील घाटीतच करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत घाटीच्या कोविड सेंटर मध्ये फक्त शहरातीलच नव्हे तर मराठवाडा, खान्देश, विदर्भ, नगर जिल्ह्यातील रूग्ण दाखल झाले होते. या सर्वांवर घाटीत उपचार करण्यात आले. जसजसी रूग्ण संख्या घटत गेली त्याप्रमाणात प्रशिक्षण देखील ढिम्म झाले. परिणाम स्वरूप दुसऱ्या लाटे मध्ये अचानक वाढलेल्या रूग्णावर उपचार करताना पाहिजे तेवढी काळजी घेण्यात आली नाही. परिणाम स्वरूप अनेक रूग्ण धास्तीने मृत्मुयूखी पडले. आतापर्यंत घाटीत १०२६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अनेक रूग्ण डाँक्टरकडे त्रास होत असल्याची तक्रार करत होते. परंतु डॉक्टर दिवसांत फक्त एकदाच तपासणीसाठी येत असल्याचे कोरोना रूग्णानी सांगितले. पहिल्या लाटेत अनेक कोरोना रूग्णाला रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. मृत्मुयूखी पडलेल्या रूग्णात अनेक रूग्ण हे समुपदेशन नसल्याने घाबरून देखील मु्त्यु झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक रूग्ण जेष्ठ वयोवृद्ध असल्याने विविध प्रकारच्या व्याधीने ग्रस्त असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे अडचणीत! थकित वेतनासाठी ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद
महिलादिनी केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी बर्गर किंगची माफी
- पंकजा मुंडे अडचणीत! थकित वेतनासाठी ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद
- भारतीय नौदलाची शक्ती आणखी वाढली; सायलंट किलर ‘INS करंज’ नौदलात दाखल
- …म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव करण्यात आला तात्पुरता स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

