भोपाळ: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका महिला सरपंचाची सामाजिक योगदान देणारी कथा. हि कहाणी आहे मध्य प्रदेशातील एका महिला सरपंचाची जिने गावाच्या विकासासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून मध्य प्रदेशची राजधानी भोपाल जवळ असलेल्या बरखेडी अब्दुल्ला या गावाची सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली. भक्ती शर्मा असे या महिला सरपंचाचे नाव आहे.
भोपाळ च्या नूतन महाविद्यालयातून पॉलिटिकल सायन्स चे शिक्षण घेतलेल्या भक्ती वकिली देखील करतात. तसेच प्रशासकीय सेवांची तयारी करताना मिळत असलेल्या अपयशा दरम्यान त्यांनी अमेरिकेत जाण्याचे ठरवले. मात्र अमेरिकेत गेल्यानंतर नोकरी करत असताना त्यांनी पुन्हा आपल्या गावी येऊन गावच्या सरपंच पदाची जबाबदारी घेण्याचे ठरविले.
भक्ती गावी परतल्या त्यावेळी 2015 16 या वर्षी गावचे सरपंच पदाच्या निवडणुका आल्या होत्या. याच वेळी आपल्या घरच्यांच्या प्रोत्साहनानं त्यांनी सरपंच पदी निवडुन येण्यासाठी निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना गावातील लोकांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी गावचे रूपच पालटून टाकले.
सध्या करत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे ते महिला आणि मुलींसाठी चालवलेल्या मोहिमा. यामध्ये महिलांना मुलीच्या जन्मानंतर आपल्या मासिक पगारातून दोन महिन्यांचा पगार भेट म्हणून देतात. त्याचबरोबर मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी गावांमध्ये दहा वृक्ष लागवड केली जाते. त्यामध्ये आत्तापर्यंत गावांमध्ये जवळपास सहा हजार 500 पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली आहे.
सरपंच पदाचा कार्यभार हाती घेताच शर्मा यांच्या प्रयत्नांतून या गावांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त घरांना कच्च्या घरातून पक्या घर बनवण्यात आला आहे. तसेच आता या गावांमध्ये पिण्याचे पाणी लाईट शौचालयाची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक सरकारी योजनांचा ग्रामस्थांना मिळवून दिलेला लाभ यामुळे गावकरी आर्थिक सशक्त झाली आहेत.
त्याचबरोबर शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या या गावांमध्ये त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. गावातील प्रत्येक रस्ते ही शाळांशी जोडले आहेत. शाळेत जाण्यासाठी मुलांना सायकल दिल्या गेले आहेत. त्याचबरोबर कुपोषण मुक्तीसाठी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन याचा परिणाम कुपोषित मुलांचे प्रमाण कमी झाल्याचा दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे अडचणीत! थकित वेतनासाठी ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद
महिलादिनी केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी बर्गर किंगची माफी
- पंकजा मुंडे अडचणीत! थकित वेतनासाठी ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद
- भारतीय नौदलाची शक्ती आणखी वाढली; सायलंट किलर ‘INS करंज’ नौदलात दाखल
- …म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव करण्यात आला तात्पुरता स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

