पुणे : ‘दलित पँथरपासून ज्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला साथ दिली. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा केली. सर्वच रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सत्तेचे पद मिळाले नाही मात्र समाजात रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान होतो. संघमित्रा गायकवाड यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना रिपब्लिकन योद्धा पुरस्कार माझ्या हस्ते देऊन स्तुत्य उपक्रम केला आहे.सत्तेच्या पदा पेक्षा रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने महत्वाचा आहे,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पुण्यातील कॅम्प मधील रामकृष्ण हॉटेल च्या सभागृहात रिपाइं च्या महाराष्ट्र् प्रदेश उपाध्यक्षा संघमित्रा गायकवाड यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन पक्षाच्या जडणघडणीत भरीव योगदान देणाऱ्या आणि कोरोनाच्या संकटात गरजू गरिबांची जनतेची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी पुण्यातील जुने जाणते रिपब्लीकन नेते रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार एम डी शेवाळे सर यांचा रिपब्लिकन योद्धा म्हणून रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबईतील समाजसेवक विलास रुपवते, प्रेस फोटोग्राफर देवेंद्र रणपिसे आदींचा रिपब्लिकन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार नाराज ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- वय वर्षे ५७, ‘हा’ अभिनेता नवरोबा म्हणून पाचव्यांदा बसला घोड्यावर
- फडणवीसांचा आक्रमक पवित्रा; अशोक चव्हाणांना नोटीस तर देशमुखांवर हक्कभंग
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

