Share

वय वर्षे ५७, ‘हा’ अभिनेता नवरोबा म्हणून पाचव्यांदा बसला घोड्यावर

Published On: 

मुंबई : ‘घोस्ट रायडर’ या हॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता निकोलस केज हा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत आसतो. भारतासह जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. निकोलस केजने नुकतेच लग्न केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ५७ वर्षीय निकोलस केजचे हे पाचवे लग्न आहे.

निकोलसने त्याच्यापेक्षा तब्बल ३१ वर्षं लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केले आहे. २६ वर्षीय जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत ५७ वर्षीय निकोलस केजने लाल वेगास येथील एका हॉटेलमध्ये लग्न केलं. यावेळी फक्त जवळच्या मित्र व नातेवाईक उपस्थित होते. या लग्नाबाबत माध्यमाना कळल्यानंतर निकने सांगितले की, तुम्ही जे ऐकल आहे ते खरं आहे आणि आमच्या या नव्या नात्यामुळे आम्ही दोघेही खूश आहोत.

निकोलस केजच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी या तारखेला निधन झाले होते. त्यामुळे त्याने वडिलांच्या स्मरणार्थ या तारखेची निवड करत निकोलस केज आणि रीको शिबाटा यांनी याच तारखेला लग्न केले होते. मात्र या लग्नाबाबत माध्यमाना खुप उशिरा कळले. लग्नानंतर छोटा स्वागत समारंभ देखील ठेवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!