नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी, दि.१३ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. काही दिवसांपासून १२ खासदारांच्या नियुक्तीवरुन हे दोघेही चर्चेत होते. आता त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्यात.
दरम्यान, उच्च न्यायालयाकडून शुक्रवारी विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर ठराविक काळात निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला देण्यात आला. यानंतर त्याच दिवशी रात्री राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट झाली. परंतु या भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर दोघांची चर्चा झाली याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari met Union Home Minister Amit Shah in New Delhi yesterday pic.twitter.com/mE2IL1iE5S
— ANI (@ANI) August 14, 2021
या भेटी संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘काल राज्यपालांनी अमित शाह यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. कालचा हायकोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना समजला असेल. अमित शाह यांनी जसे ३७० कलम हटवत ऐतिहासिक कार्य करुन देशाची वाहवा मिळवली तसे महाराष्ट्रात या १२ आमदारांबाबत जी राजकीय बंदी घातली आहे. ती हटवली पाहिजे,’
दरम्यान, राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्यपाल कोश्यारी यांनी अनेक महिने उलटूनही केलेली नाही. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर काल सुनावणी झाली. राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास अवाजवी विलंब लावला आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

