मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय असलेले ‘खतरों के खिलाडी ११’ च्या फायनल शूटिंग नंतर अभिनेता राहुल वैद्य आणि दिशा परमार हे दोघे नुकतेच हनीमुनला निघाले असून विमानतळावर त्या दोघांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अभिनेता राहुल आणि दिशा टीव्हीवर लोकप्रिय जोडप्यापैकी एक आहेत.
दीर्घ काळ रिलेशनशिपनंतर दोघांनी या वर्षी जुलैमध्ये लग्न केलं. लग्नात फक्त कुटूंब आणि जवळचे लोक उपस्थित होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर राहुल, दिशा हनीमूनला गेले नाहीत कारण दोघंही आपापल्या कामाचे कमिटमेंट पूर्ण करत होते. मात्र आता दोघं एकत्र फिरायला बाहेर गेले आहेत. बुधवारी दिशा आणि राहुल विमानतळावर दिसले. दोघंही कॅज्युअल लुकमध्ये दिसले. दोघंसोबत खूप छान दिसत होते.दिशा आणि राहुल कुठे फिरायला जात आहेत हे अद्याप गुपित असलं तरी हे दोघंही त्यांच्या हनीमूनला निघाले आहेत, हे नक्की.
दरम्यान दिशा आणि राहुल यांनी नुकतंच लग्नानंतर प्रथमच गणेश चतुर्थी साजरी केली होती. सध्या दिशा ‘बडे अच्छे लगते है २’ या शोमध्ये दिसत आहे. दिशा आणि नकुलची जोडी शोमध्ये खूप पसंत केली जात आहे. दुसरीकडे राहुल खतरों के खिलाडी ११ मध्ये दिसला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत जास्त करावी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक सल्ला’
- दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मधील जवानांना वाचवण्यासाठी स्थानिकांची ३ किमीची खडतर पायपीट, मात्र…
- राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबईतील मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी भाजपने आखला ‘हा’ प्लान
- ‘माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न’; अभिनेत्री पायल पुन्हा चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

