Share

‘माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न’; अभिनेत्री पायल पुन्हा चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या पायलचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याबद्दल बोलतांना दिसत आहे.

दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावला होता. मात्र सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पायलच्या चाहत्यांनी व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये पायल म्हणते, ‘हाय.. मी पायल घोष आहे. मी काही औषध खरेदी करण्यासाठी मेडीकलमध्ये गेली होती. त्यानंतर मी जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा त्याठिकाणी काही लोक आले आणि त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात एक बॉटल होती.’

https://www.instagram.com/p/CUC0mLWqlbo/?utm_medium=copy_link

पुढे ती म्हणाली, ‘माझ्या मते त्यांच्या हातात ऍसिड होता. त्यांच्या हातात रॉड देखील होते. त्यांचा रॉड माझ्या हाताल लागला. ज्यामध्ये मी जखमी झाले. त्यानंतर मी आरडा ओरडा केला त्यानंतर ते सगळे पळून गेले. त्यामुळे मी आता एफआरआय दाखल करणार आहे..’ पायलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. तसेच पायलने २०१७ मध्ये ऋषि कपूर यांच्या ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सध्या ती मुंबईत राहत असून तिच्या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!