Share

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मधील जवानांना वाचवण्यासाठी स्थानिकांची ३ किमीची खडतर पायपीट, मात्र…

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : देशावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं की छातीची ढाल करून सैन्य दल देशाच्या रक्षणासाठी आणि मदतीसाठी तय्यार असतं. देशातील कोणत्याही जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली अथवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला कि स्थानिकांसाठी सैन्य दल हे खंबीरपणे उभे राहतात. आता सैन्य दलातील जवान संकटात असताना स्थानिकांनी त्यांच्या बचावासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. त्यामध्ये, दोन जवान जखमी झाले होते. त्यांच्या मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. पत्नीटॉपच्या शीवगढ धार येथील परिसरात सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी, हेलिकॉप्टरचे इंजिन सुरू असताना स्थानिकांनी धाव घेत पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढले. हा अपघात मुख्य रस्त्यापासून दूरच्या डोंगराळ भागात झाला होता.

या जवानांचे प्राण वाचवण्यासाठी स्थानिकांनी जीव देखील धोक्यात घातला. कारण इंजिन सुरु असल्याने अपघातानंतर स्फोट होण्याचा धोका होता. तरीही, स्थानिकांनी मदत व बचावकार्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पायलट आणि सहपायलट या दोघांना बाजेवर टाकून तब्बल तीन किमीचा रस्ता डोंगरवाटांतून, पावसाच्या पाण्यातून पार केला. त्यानंतर, त्यांना करलाहपर्यंत गावकऱ्यांनीच पोहोचले. तोपर्यंत पोलीस आणि सैन्यातील काही अधिकारीही पोहोचले.

तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ऊधमपूर येथील सैन्याच्या हॉस्पीटलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, एवढे प्रयत्न करूनही जवानांचा जीव वाचविण्यात अपयश आलं. दोन्ही जवानांच्या वीरमरणाच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!