🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली होती.
त्यानंतर आज बुधवारी सकाळी अकरा वाजता संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री.@SanjayRupadhyay जी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. @ChDadaPatil दादा आणि मुंबई अध्यक्ष मा. @MPLodha जी यांच्या सह अन्य मान्यवर नेत्यांसोबत उपस्थित होतो. pic.twitter.com/Cb7EQ0UaS5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 22, 2021
भाजप युवा मोर्चापासून राजकारणाची सुरुवात केलेले संजय उपाध्याय मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. ते भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवरही होते. उत्तर भारतीयांवर त्यांचा प्रभाव असून, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीवरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. ५६ वाले मुख्यमंत्री होऊ शकतात तर ५४ वाले उपमुख्यमंत्री आणि ४४ वाले महसूलमंत्री होऊ शकतात. तर १०६ आणि १३ अपक्ष असे ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत. संजय उपाध्याय राज्यसभेवर जाणारच असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
