मुंबई : पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. शिवसेना विरूद्ध भाजप अशी मुख्य लढत यावेळी या निवडणुकीमध्ये पहायला मिळणार आहे. दरम्यान या निवडणुकांसाठी राज्यात सत्ता असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता भाजपने ‘मराठी कट्टा’ नवी संकल्पना पुढे आणली आहे. मराठी मतदार अधिक जवळ यावेत यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपची ही नवी संकल्पला पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून ‘मराठी कट्टा’ संकल्पनेला सुरूवात होणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मराठी कट्टा या संकल्पनेच्या आयोजनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिका निवडणूक कोअर कमेटीवर असलेले आमदार नितेश राणे व आमदार सुनील राणे यांच्यावर देण्यात आले आहेत. भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्यायावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजप या संकल्पनेतुन करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मधील जवानांना वाचवण्यासाठी स्थानिकांची ३ किमीची खडतर पायपीट, मात्र…
- ‘५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होऊ शकतात, तर मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?’
- राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- ‘लायकीनुसार नुकसानीची किंमत ठरते मग राऊतांची किंमत सव्वा रुपया’; निलेश राणेंची टीका
- ‘संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर ठोकणार सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

