Share

‘राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत जास्त करावी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक सल्ला’

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपये मानहानीचा दावा केला आहे. तर यावरच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’संजय राऊत माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन की, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. त्यामुळे चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असेही चंद्रकांत पाटलांनी सुचविले आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी संजय रौअत यांना पत्र लिहित म्हटले आहे की, ‘तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार.’

दरम्यान यावरूनच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले होते. तर यावरच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!