मुंबई- मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीलगतच्या गावांचं, शेतीचं किती नुकसान झालं आहे. या वादळाने नुकसान केलेल्या भागाचे आता विविध पक्षाचे नेते दौरे काढत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील कोकण दौऱ्यावर जाऊन आले आहेत.
आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
दि. 11 जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देतील, तर दि. 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील आणि स्थानिकांशी संवाद साधतील.
दरम्यान,निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय तोकड्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील लोकांची निराशा केली असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी पश्चिम बंगालला केंद्रानं पॅकेज दिलं ते चांगलंच झालं. त्या ठिकाणी १८ जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी प. बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल दुमत नाही. त्याठिकाणी १८ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे.आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान @narendramodi यांनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा. pic.twitter.com/p9zqklSCR9
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2020
हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करण्याची गरज आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे, असं शरद पवरांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती करोनामुक्त झालं; महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल – अजित पवार
असंवेदनशील ट्वीटमुळे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपयांची मदत अत्यंत तोकडी, फडणवीसांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

