मुंबई : भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १२७ वर पोहचली असून देशात तिघांचा मृत्यू करोनामुळं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, मॉल सर्व काही बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. तर गर्दी टाळण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
या परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे. चित्रपट महामंडळाने चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सर्व कलाकार मंडळी घरी बसून काहीना काही काम करत आहेत. सोशल मीडियावर स्टोरीज शेअर करत आहेत. हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिनं दिलेल्या अजब सल्ल्यामुळं तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
दिव्यांकानं एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात दिव्यांका तिच्या कारमधून प्रवास करताना दिसतेय. नेहमी ट्र्रफिकमुळं जाम असणारे रस्ते मात्र रिकामे दिसतात. या व्हिडिओत दिव्यांकानं ट्रॅफिक कमी झालं आहे. आता मेट्रोचे कर्मचारी कामं करू शकतात, असं तिनं म्हटलंय. दिव्यांकानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. रेल्वेचे किंवा मेट्रोचे कर्मचारी हे माणूस नाहीत का? असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे. एकानं ‘तुला जितकी काळजी घेण्याची गरज आहे तितकीच त्यांना देखील काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर दिव्यांकानं हा व्हिडिओ ट्विटर वरून डिलिट केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

