Share

रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपयांची मदत अत्यंत तोकडी, फडणवीसांचा घणाघात

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी मदत जाहीर केली ती अतिशय तोकडी असून सरकारने तातडीने आणखी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

बाजारपेठा फुलू लागल्या! अडीच महिन्यांनी तुळशीबागेत पण गजबज

कोल्हापूरसाठी 4800 कोटींचे आणि परिसरासाठी 2105 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. 6800 कोटींचं एकूण पॅकेज जाहीर केलं होतं.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरानंतर त्यावेळी जेवढी मदत करण्यात आली त्याच प्रकारची मदत केली जावी अशी मागणी त्यांनी केली. या भागासाठी जाहीर केलेली 100 कोटींची मदत ही अतिशय अपुरी आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे. त्यामुळे योग्य ती मदत करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जेव्हा महापूरात नुकसान झालं तेव्हा आम्ही काही निर्णय घेतलं होतं त्याच प्रकारचे निर्णय घ्या अशी आमची मागणी नाही मात्र सरकारने पुरेशी मदत करावी असं सांगत त्यांनी काही मागण्याही ठाकरे सरकारकडे केल्या. एनडीआरएफच्या निकषाने आपण नुकसान भरपाई करतो आणि मग केंद्र सरकार आपल्याला आपण दिलेली रक्कम परत करते. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे.

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता” असे ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!