Share

बारामती करोनामुक्त झालं; महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. बारामतीकरांनी कोरोनाविरोधातील युद्ध जिंकले आहे. बारामती शहर सध्या कोरोनामुक्त शहर झालं आहे. ‘तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं ते म्हणाले. तसेच, अशाचप्रकारे महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

पुढे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘करोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला’.

दरम्यान, बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्याच्यावर पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते. ससुन रुग्णालयातून या रुग्णाला गुरुवारीडिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बारामतीकर आता कोरोनामुक्त झाले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!