Share

शेतकऱ्यांनो, मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय : मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (शनिवारी) १७ वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय नेते यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्यात. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शेतकऱ्यांना कृषी कायदे पटवून देण्याचा हरएक प्रयत्न सरकारकडून केला जातोय. अनेक स्तरांवर शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. परंतु, कृषी कायदे मागे घ्यावेत, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

या दरम्यान, कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे, असे मोदी म्हणाले. कृषी पायाभूत सुविधा, साठा, कोल्ड साखळी दरम्यानचे अडथळे आता दूर केले जात आहेत. कृषी कायद्यांच्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकर्‍यांना शेती कायद्याद्वारे आपली पिके बाजाराबाहेर विकण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे मोदी म्हणाले.

गेल्या ६ वर्षांत भारताने असे सरकार पाहिले आहे जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासियांच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे. प्रत्येक स्तरावरील देशवासियाला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही एकत्र येऊन काम केले आहे. नीती बनविली, निर्णय घेतले, परिस्थिती सांभाळली आहे. यामुळे सारे जग चकित झाले आहे, असेही मोदींनी या बैठकीमध्ये सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!