Share

‘तो’ काँग्रेस संपवण्याचा डाव, काँग्रेस नेत्याचा दावा; आता संजय राऊतांनी दिलं चोख प्रत्युत्तर

Published On: 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला गेला.

यानंतर, पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. ‘दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा’, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत 23 सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर, काँग्रेसला मिटवण्यासाठीचं हे षडयंत्र असल्याची देखील त्यांनी टीका केली होती.

दरम्यान, पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे म्हणाले, यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची नियुक्ती होणार अशा आशयाच्या चुकीच्या बातम्या काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते कि यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही.

संजय निरुपम यांनी केलेलय विधानावर आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काँग्रेस पक्ष हा गेली दीडशे वर्ष देशामध्ये काम करत आहे. कोणी कोणाला संपवत नाही. कधीकाळी दोन खासदार असलेला भाजप आज सत्तेवर आहे आणि सर्व शक्तिमान आहे हे मान्य केलं पाहिजे. काँग्रेसनेही भाजपला-जनसंघाला संपवलं होतं. पक्षाचा नेता आपल्या पक्षाला कोणती दिशा दाखवतो आणि नेतृत्व करतो यावर पक्षाचं भविष्य ठरतं’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!