Share

शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे.

यावर आता देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या नावासकट त्यांना ते लक्षात ठेवतात. पक्षातील कार्यकर्ता आणि नेता कुणालाही ते सहज उपलब्ध होतात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार. पवारसाहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. असा माणूस जर युपीएचा अध्यक्ष झाला तर मला नक्की आवडेल, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

मात्र दुसरीकडे मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. तर या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे म्हणाले, यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते कि यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!