Share

शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार

Published On: 

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते  आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले.

आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. या वक्तव्यांमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, अशी टीका केली.

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांचा अपमान करणारे रावसाहेब दानवे येडपट आणि भैताड आहेत. हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी दानवेंवर केली.

दरम्यान, दानवेंचे जावई व कट्टर राजकीय विरोधक हर्षवर्धन जाधव यांनी देखील काल दानवेंवर विखारी टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांचे कर्तुत्व पूर्णपणे शून्य आहे. आधी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आता प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात तसे दानवे पुढे आले आहेत. एखाद्या गावागुंडाप्रमाणे सत्तेचा अमरपट्टा असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे, अशी टीका जाधव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!