Share

भाजप सर्वशक्तिमान आहे हे मान्य करायला हवं – संजय राऊत

Published On: 

नाशिक : भाजप आणि शिवसेना यांची युती सुमारे दोन दशकांहून अधिकची होती. मात्र, गेल्यावर्षी विधानसभांच्या निकालानंतर काही मागण्यांवरून मतभेद झाल्याने शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. केंद्रातील एनडीएमधून देखील शिवसेनेनं बाहेर पडत मोदी सरकारचा पाठींबा काढून घेतला.

यानंतर, गेल्या वर्षभरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अनेक वाद सुरु असून भाजपने शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलेलं पाहायला मिळालं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे उद्धव ठाकरे विराजमान असून भाजपने त्यांच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केली आहे. भाजपने हे टिंडा तिघाडी सरकार आपल्या कृत्यानेच पडेल अशी टीका केली होती.

मात्र, या सरकारने वर्षपूर्ती केली आहे. अशातच, देशातील शेतकरी आंदोलनाच्या पर्सवभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर युपीएची सूत्रे देखील शरद पवार यांच्या हाती देण्यात येणार असल्याच्या चर्चा दिल्लीत रंगल्या होत्या. शरद पवार यांनी हे नाकारलं असलं तरी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा काँग्रेस संपवण्याचा डाव असल्याची टीका केली होती.

याविषयी आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रश्न करण्यात आला होता. ‘काँग्रेस पक्ष हा गेली दीडशे वर्ष देशामध्ये काम करत आहे. कोणी कोणाला संपवत नाही. कधीकाळी दोन खासदार असलेला भाजप आज सत्तेवर आहे आणि सर्व शक्तिमान आहे हे मान्य केलं पाहिजे. कधीकाळी काँग्रेसनेही भाजपला-जनसंघाला संपवलं होतं. पक्षाच्या नेतृत्वावर पक्षाचं भविष्य अवलंबून असतं,’ असं संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!