मुंबई : काही दिवसापुर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि केन विल्यमसन यांची तुलना करताना विराट भारतात असल्यामुळे जास्त लोकप्रिय आहे अशी टिका केली. यानंतर मायकल वॉन चांगलाच ट्रोल झाला. यावेळी पाकिस्तानचा क्रिकेटपटु सलमान बट्टने पुढे येत विराट कोहलीची बाजू घेतली.
यानंतर सलमान बट्टने पुन्हा पुढे येत भारताचा फिरकीपटु कुलदीप यादवच्या मदतील धावला आहे. गेल्या काही काळापासुन संघातील स्थान गमावलेल्याा कुलदिप यादवला पुनरागमन करण्यासाठी सल्ला दिला आहे. एका युट्युब चॅनेलला मुलाखत देतना सलमान म्हणाला की,’कुलदीप यादवला जर संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला पहिले त्याचा आत्मविश्वास परत मिळवावा लागेल. यासाठी कुलदीपने स्थानीक क्रिकेट स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे. तो जर एक रणजीचा हंगाम खेळला तरी तो पुनरागमन करु शकतो.’ असे सलमान बट्ट म्हणाला.
आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात भारताचा आघाडीचा फिरकीपटू कुलदीप यादवला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. याबद्दल कुलदीप यादवने नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील केवळ ४ एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली तेव्हा पासुन त्याला एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी नाही मिळाली. तर आयपीएल स्पर्धेत केकेआरच्या संघाने देखील त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
- कपडे विक्री करणाऱ्या दुकानदारासह ग्राहकाविरूध्द गुन्हा दाखल
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

