Share

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी पार पडली. त्यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारले.

SSC, ICSC, CBSC बोर्डाने यंदाची दहावीची परीक्षा रद्द केलीय. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे. ‘विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही. राज्यातील शिक्षण धोरणकारांना हे माहिती असायला हवं. हे मुळीच मान्य होऊ शकत नाही,’ अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सुनावलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोकण दौऱ्यात माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. ‘परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार ? याकडं लाखो विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!