औरंंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असतांना देखील कपड्याचे दुकान उघडून ग्राहकांना कपडे विक्री करणा-या दुकानदार, दुकानातील नौकर आणि तीन ग्राहकाविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांण्डेय यांनी दिलेल्या आदेशावरून अलॉप्ट रेडिमेड शॉप हे कपड्याचे दुकान सील करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलॉप्ट रेडिमेड कपड्याचे दुकानाचे मालक बिलाल सिद्दीक्की, दुकानातील नौकर शेख मोहम्मद एहसान शेख मोहम्मद रफी (रा.मोगलपुरा, कोहिनुर कॉलनी), कपडे खरेदीसाठी आलेले ग्राहक शेख मोहंमद बाबर (रा.रेहमानिया कॉलनी), सोफियान अश्रफ पठाण, अंन्सार मुक्तार पठाण (दोघे रा.ढाकेफळ, ता.पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पैठणगेट परिसरातील टिळकपथ येथील अलॉप्ट रेडिमेड कपड्याच्या दुकानातून कपडे विक्री होत असून दुकानात ग्राहक असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांना मिळाली होती. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे, अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष राऊत, सहाय्यक फौजदार नसीम, जमादार मंगेश पवार, मनोज चव्हाण, अमोल मनोरे यांनी अलॉप्ट रेडिमेड शॉपवर छापा मारून कपडे विक्री करणाऱ्या दुकानदारासह ग्राहकांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर दुकान सिल करण्याची कारवाई केली.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

